• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सौहार्दपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

जळगाव, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाविद्यालय परिसरात रॅगिंगला पूर्णपणे प्रतिबंध करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, मैत्रीपूर्ण संबंध आणि सकारात्मक संवाद वाढविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत महाविद्यालयातील विद्यमान रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रेक्टर सुरेंद्र गावंडे, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, चेतन साखरे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वराज आणि मुस्कान, लिपीक ललीत बोंडे हे उपस्थित होते. नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेताना कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी नियम, त्याचे गांभीर्य आणि तक्रार नोंदविण्याच्या विविध माध्यमांची माहिती देण्यावर भर देण्यात आला.महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये तसेच वसतिगृह परिसरात नियमित पाहणी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि आवश्यकतेनुसार समुपदेशन करण्याबाबतही चर्चा झाली.

रॅगिंगमुक्त, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक जबाबदारीने कार्य करावे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. तसेच पुढील महिन्यात वरीष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थ्यांसमवेत संयुक्त बैठकीच्या आयोजनाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Next Post
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे - अशोक जैन

ताज्या बातम्या

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जळगाव जिल्हा

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गुन्हे

उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई
कृषी

जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई

October 6, 2026
प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार
जळगाव जिल्हा

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add