• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमधील युवकांशी सुसंवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘स्वतः पाहा, स्वतः विचार करा, स्वतः शिका आणि अनुभवातून पुढे जा,’ हा श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंचा स्वभावच होता. एखादी गोष्ट कशी करायची, एवढ्यावर ते थांबत नसत. ती का करायची, तिच्यामागचा विचार काय आहे आणि त्याचा समाजाला काय उपयोग होणार आहे, हे समजून घेण्याची सवय त्यांनी आम्हाला लावली. असे त्यांनी सांगून युवकांसह पुढील पिढीसाठी इंटरॅक्टिव्ह, ऑडिओ-व्हिडिओचा उपयोग करून गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘गांधीतीर्थ’ ची निर्मिती केली आहे. दीपस्तंभाप्रमाणे भविष्यातदेखील गांधीतीर्थचे काम सुरू राहील, अशी ग्वाही जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.

गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पचा ३ ऑक्टोबर रोजी समारोप झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अश्विन झाला हे होते. शिबिराच्या काळात घडलेल्या गोष्टींचे एकत्रित संकलन केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करून सहभागी शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना अशोक जैन म्हणाले की, ‘आमचे वडील श्रद्धेय मोठेभाऊंनी आयुष्यभर केवळ एक संस्था उभी केली नाही, तर माणसं घडवली. त्यांची काम करण्याची पद्धतच त्यांची शिकवण होती. आम्हा मुलांना किंवा सहकाऱ्यांना त्यांनी कधी बसवून मोठमोठे धडे दिले नाहीत. त्यांचं स्वतःचं जगणं, काम करणं आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्यांची नजर वेगळी होती. ते म्हणजे ‘ओपन युनिव्हर्सिटी’ होते. ते आज प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांची उपस्थिती आजही जाणवते,’ असे भावनिक विचार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘हिंदी है हम करोडो करोड…’ हे गाणे नरेंद्र वडगावकर यांनी सादर केले. आसाम राज्यातील सहभागी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या पारंपरिक जापी टोपीने अब्दुलभाई यांच्या हस्ते अशोक जैन यांचा सत्कार करण्यात आला.

‘ती आणि मी’ या मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतही रूपांतर झाले. असे उपस्थितांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अशोक जैन यांनी या संवादात उत्तरे दिली. त्यानंतर शिबिरार्थींचे प्रातिनिधीक मनोगत व्यक्त झाले. त्यात प्रिया दुबे, शिवानी बाथम (मध्य प्रदेश), अनुराग सिंग (पश्चिम बंगाल), राकेश कुमार (बिहार), रितेश कुमार (छत्तीसगड), पैंजन गुरनुले (महाराष्ट्र) यांचा समावेश होता. दीपक मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले.

▪️गांधीतीर्थ परिसरात भारताचा दगडी नकाशा उभारणार
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमात ‘भारत की संतान’ हे भारतातील विविध राज्यांच्या भाषा, वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि चैतन्यमय संस्कृतीचे मनोहारी सादरीकरण झाले होते. त्यात सहभागी नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमधील युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. राज्याचे सादरीकरण होतांना नकाशातील त्या त्या राज्यांसमोर मेणबत्ती पेटविली जायची. ही संकल्पना आपल्याला खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर भारताचा मोठा दगडी नकाशा कलात्मक पद्धतीने तयार करून गांधीतीर्थ परिसरात त्याची मांडणी करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.


 

Next Post
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जळगाव जिल्हा

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गुन्हे

उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई
कृषी

जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई

October 6, 2026
प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार
जळगाव जिल्हा

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add