• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकी पडल्याने नवल अर्जुन सोनवणे (३७, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळेच नवल यांचा बळी गेल्याचा संतापजनक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, नवल सोनवणे हे मेहरुण परिसरातील काम आटोपून दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील आपल्या घरी परतत होते. छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यावरून पुढे जात असताना नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले होते. गटारीवर कोणताही ढापा टाकण्यात आलेला नव्हता.

नवल दुचाकीवरून पुढे जात असताना त्यांना रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीचा अंदाज आला नाही. अचानक दुचाकी गटारीच्या ब्लॉकमध्ये जाऊन अडकल्याने नवल जोरात खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याचे आणि गटारीचे काम सुरू असतानाही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उघड्या गटारीभोवती संरक्षण व्यवस्था करण्यात आली नव्हती, तसेच वाहनचालकांना धोक्याची सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नव्हता. गटारीवर सुरक्षेच्या दृष्टीने कल्व्हर्ट अथवा अन्य व्यवस्था केली असती किंवा किमान सूचना फलक लावला असता, तर नवल यांचा जीव वाचला असता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

नवल सोनवणे हे एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांचे गेल्या वर्षीच निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी नवल यांच्यावर होती. त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबाचा आधारच हरपल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add