• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

जळगावसह धुळे, मालेगाव, बुलढाण्यात नेटवर्क 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

जळगाव, प्रतिनिधी : एमडी ड्रग्जची तस्करी करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या सराईत गुन्हेगार अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा) याला एमडी ड्रग्जचा पुरवठा तांबापुरातील शेख अजमल शेख इस्माईल उर्फ अज्जू मालेगाव (वय ४५) याने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अज्जू मालेगाव हा ड्रग्जच्या नेटवर्कमधील मुख्य पुरवठादार म्हणून काम करीत असल्याचा पोलिसांचा संशय असून, त्याचे जळगावसह धुळे, मालेगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांपर्यंत नेटवर्क असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

पाळधी-तरसोद बायपास महामार्गावरील कचरा फॅक्टरीजवळ १ ऑक्टोबर रोजी अजय गारुंगे हा एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली होती. त्याच्याकडून ६४.४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे १ लाख ९३ हजार रुपये आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

चौकशीदरम्यान अजय गारुंगे याने त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग्ज हे तांबापुरा परिसरातील त्याच्या ओळखीच्या शेख अजमल शेख इस्माईल उर्फ अज्जू मालेगाव याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अज्जू मालेगावचा शोध सुरू केला आहे. अज्जूने अजय गारुंगेसह फरार असलेल्या सोनू गणेश कुंभार (वय २५, रा. तांबापुरा) यालाही एमडीचा पुरवठा केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अज्जू मालेगाव मुंबईहून मोठ्या प्रमाणात, किलोच्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणत असल्याचा संशय आहे. त्यानंतर जळगावसह धुळे, मालेगाव आणि बुलढाणा परिसरातील पेडलरांना मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मोठ्या प्रमाणातील साठ्यातून पेडलरांना व्यावसायिक प्रमाणात ड्रग्ज पुरविले जात होते आणि संबंधित पेडलर मागणीनुसार त्याची पुढे विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.

गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी एमडी ड्रग्जच्या प्रकरणांत अनेक पेडलरांना अटक केली आहे. त्यामुळे अज्जू मालेगावच्या माध्यमातून आणखी किती लहान-मोठ्या पेडलरांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. एकाचवेळी अनेक पेडलरांना मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होत असल्याने अज्जू मालेगाव हा या ड्रग्ज नेटवर्कमधील प्रमुख पुरवठादार असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

अजय गारुंगे आणि शेख अजमल उर्फ अज्जू मालेगाव यांची काही वर्षांपूर्वी एका जिममध्ये ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. या ओळखीतूनच पुढे एमडी ड्रग्जच्या तस्करीचे नेटवर्क उभे राहिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दोघांचे नेटवर्क जळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पसरले असल्याने पोलिस या संपूर्ण साखळीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, शेख अजमल उर्फ अज्जू मालेगाव याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या सुमारे २० वर्षांपासून तो गांजाच्या तस्करीत सक्रिय असल्याचेही तपासात समोर आले आहे. एमडी ड्रग्जच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे पुढे आल्याने जळगाव पोलिसांसह धुळे आणि मालेगाव पोलिसांचेही त्याच्या हालचालींकडे लक्ष आहे.

अज्जू मालेगाव आणि सोनू कुंभार या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. त्यांच्या अटकेनंतर ड्रग्जच्या पुरवठ्याची साखळी, त्यांच्याशी संपर्कात असलेले पेडलर तसेच जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या नेटवर्कबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


 

Next Post
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

ताज्या बातम्या

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add