• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

२५ सप्टेंबरला सायंकाळी ६ पासून २६ सप्टेंबर दुपारी १२ पर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 23, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत काही मार्ग अवजड वाहने, एसटी बसेस, कार तसेच दुचाकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सेशन कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, लग्न मार्केट, नाट्यगृह परिसर, टाकळीवरील मंदिर, बागवान मोहल्ला, जोशी पेठ, सुभाष चौक आणि बेडा चौक या मार्गांवरून होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हे बदल करण्यात येत आहेत.

जळगाव-पाचोरा मार्गावरील एसटी बसेससह अन्य वाहतुकीसाठी शिरसोली रोडचा पर्यायी वापर करण्याचे नियोजन आहे. जड व मध्यम वाहनांसाठी इच्छादेवी चौकी, गणेश घाट परिसर आणि शिरसोली रोडमार्गे वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद आहे.
पाचोऱ्याकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यावल, चोपडा, कानळदा, भोकर आदी भागांतून येणाऱ्या एसटी बसेस व इतर वाहनांसाठीही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दूध फेडरेशनकडील रेल्वे फाटक क्रमांक १४८ बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी बसेस, अवजड वाहने, कार व दुचाकींसाठी शिवाजीनगर रेल्वे पुलाचा तसेच कानळदा रोडवरील रेल्वे पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हलकी व लहान वाहने तसेच दुचाकींसाठीही उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीच्या काळात पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
खान्देश

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 23, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
खान्देश

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 23, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक

September 23, 2026
गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट
गुन्हे

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट

September 23, 2026
पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
जळगाव जिल्हा

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add