• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

जळगाव, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते सर्जा-राजाची पूजा करण्यात आली.

यावेळी बैलांना सजवून त्यांची आरती करण्यात आली तसेच उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेतकर्‍याचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषि अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे,अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, संचालक सतिष सावके, डॉ. मिलींद तायडे, प्रा.सुशिल चव्हाण, परिचारीका अधिक्षक मनिषा खरात,प्रा किर्ती पाटील, डॉ. गुणवंतराव सरादे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, प्रशासन अधिकारी चेतन चौधरी, देवेंद्र भंगाळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम साधत महाविद्यालयात बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनात बैलांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच कृषी संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली जावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add