• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; २०१२ मध्येही लाचखोरीचा गुन्हा

जळगाव प्रतिनिधी : लाचखोरीच्या प्रकरणात यापूर्वी कारवाई झालेल्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला पुन्हा लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर २०० रुपये घेण्याचे निश्चित झाले आणि ते स्वीकारताच एसीबीने कारवाई केली.
भगवान रोहिदास गायकवाड (५१, भुसावळ) असे कारवाई झालेल्या भूकरमापकाचे नाव आहे. जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारी ही कारवाई झाली.

नेरी बुद्रूक येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने शेतीची मोजणी करण्यासाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक आणि टिपण उतारा मिळविण्यासाठी २ सप्टेंबरला अर्ज केला होता. या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी गायकवाड यांनी ७०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने एसीबीकडे केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारण्यास गायकवाड यांनी सहमती दर्शविली. ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना पकडले.

१४ वर्षांनी पुन्हा एसीबीच्या जाळ्यात
गायकवाड यांच्याविरुद्ध २०१२ मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

आता १४ वर्षांनी पुन्हा लाचखोरीच्या प्रकरणात ते एसीबीच्या कारवाईला सामोरे गेले आहेत.
पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहिले. हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add