• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 7, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

जळगाव, प्रतिनिधी : समाजसेवेच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव शहरातील रोटरीच्या भैय्यासाहेब नथमलजी लुंकड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी असिस्टंट गव्हर्नर ॲड. सागर चित्रे, माजी प्रांतपाल डॉ. सिकची, नाना शेवाळे, राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते रोहित आहुजा यांनी क्लबचे चार्टर प्रेसिडेंटपद स्वीकारले. तसेच धनराज कासट व पुनीत तरलेजा यांनी चार्टर सेक्रेटरीपदाची जबाबदारी स्वीकारली.

चालू वर्षासाठी क्लबच्या Board of Directors (BoD) ची निवडही यावेळी करण्यात आली. यामध्ये ट्रेझरर सीए सौरभ शाह, व्हाईस प्रेसिडेंट सरिता झावर, तसेच पूनम वर्मा, योगेश सांखला, निकुंज अग्रवाल, विनीत आहुजा, दर्शन जैन, पराग बेदमुथा, मयूर ओसवाल, तुषार भांबरे, प्रकाश मुळे आणि डॉ. महेंद्र मल्ल यांचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांना क्लबचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्लबची सदस्यसंख्या ६२ झाली आहे. यामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे. आगामी काळात जळगाव शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबवून समाजासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा मानस क्लबच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला. नवीन क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून गरजूंसाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add