• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 7, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

जळगाव, प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाइल, व्यसनाधीनता आणि क्षणभंगुर सुखांच्या मागे धावताना आई-वडिलांशी असलेला संवाद आणि जिव्हाळा कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत आई-वडिलांचे महत्त्व, त्यांचा त्याग आणि मुलांची त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी याची जाणीव करून देणारा ‘न समजलेले आई-बाप’ हा भावनिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम जळगावात अत्यंत हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे रविवार, ६ सप्टेंबर रोजी मु. जे. महाविद्यालयातील कवी कालिदास सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या भावनिक संवादातून उपस्थित मुला-मुलींना आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून दिली.

प्रा. हंकारे यांनी आपल्या प्रभावी शैलीत सांगितले की, आई-वडील जिवंत असताना त्यांची कदर करा, त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणू नका. ते गेल्यानंतर त्यांच्या फोटोला हार घालण्यात अर्थ नाही. आईने नऊ महिने वेदना सहन करून मुलाला जन्म दिला, तर वडील आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा आधार बनतात. त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे.

प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान उपस्थित वडिलांना व्यासपीठावर बोलावून मुलींना आपल्या वडिलांजवळ जाण्याचे आवाहन केले. ‘वडिलांना समजून घ्या, त्यांच्या जवळ जा आणि एकदा त्यांना मिठी मारून पहा,’ असे आवाहन करताच अनेक मुलींच्या भावनांचा बांध फुटला. मुलींनी आपल्या वडिलांना मिठी मारताच सभागृहातील वातावरण भावूक झाले. अनेक मुलींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांनीही आपल्या लेकींना जवळ घेत भावनांना वाट करून दिली. या हृदयस्पर्शी प्रसंगामुळे काही काळ संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.

मोबाइलच्या गुलामीतून बाहेर पडा.. -पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी युवा पिढीने मोबाइलच्या आहारी जाण्याऐवजी कुटुंबासाठी वेळ द्यावा, असे आवाहन केले. मुलांनी आई-वडिलांशी संवाद वाढवून कुटुंबव्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालला’ – आ. सुरेश भोळे
आमदार सुरेश भोळे यांनी आजच्या धावपळीच्या युगात आई-वडील आणि मुलांमधील संवाद हरवत चालल्याची खंत व्यक्त केली. हा संवाद पुन्हा जिवंत करण्याची गरज असून, कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. हंकारे यांनी तरुण पिढीने मोबाइल आणि क्षणिक सुखांच्या मोहातून बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता रमाई, राजमाता जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. आईच्या कष्टांची जाणीव ठेवून तिचा सन्मान करावा आणि वडिलांच्या त्यागाचे मोल ओळखावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘आई-बापाला समजून घ्या’ हा संदेश मुलांच्या मनावर ठसवण्यात आला. भाषणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून आई-वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव मुलांना मिळाला.

१०० सोशल मीडिया पत्रकारांना ₹१० लाखांचे अपघाती विमा संरक्षण..
कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुरेश भोळे यांच्या पुढाकारातून जळगावातील १०० छायाचित्रकार व सोशल मीडिया पत्रकारांसाठी पोस्ट विभागाच्या माध्यमातून प्रत्येकी ₹१० लाखांचे अपघाती विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. पत्रकार आणि सोशल मीडिया प्रतिनिधी हे समाजातील विविध घडामोडींचे वार्तांकन करताना सतत धावपळीत आणि अनेकदा जोखमीच्या परिस्थितीत काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही विमा योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या विमा योजनेचे कार्यक्रमात पत्रकार अरुण इंगळे यांना विमा पॉलिसीचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती..
कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, आकाश भंगाळे, विनय चांडक, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी  फाउंडेशनचे प्रभारी अध्यक्ष सचिन पाटील आणि सचिव अभिजीत पाटील यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमीत देशमुख यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमीत देशमुख यांनी केले, तर प्रास्ताविक अभिजीत पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे सदस्य हेमंत पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, भूषण पाटील, पांडुरंग महाले, भूषण हंसकर, रुपेश महाजन यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

ताज्या बातम्या

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार
जळगाव जिल्हा

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

October 24, 2026
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन
क्रिडा

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

October 24, 2026
सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन
खान्देश

सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन

October 24, 2026
उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या
खान्देश

उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या

October 24, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add