• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

जळगाव : अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या ४२ वर्षीय रुग्णावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णावर वेळेचे महत्त्व ओळखून तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही काळ रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासली. मात्र अवघ्या तीन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होऊन तो सामान्य स्थितीकडे परतला.
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय सुरेश यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. नातेवाईकांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने सीटी स्कॅन केला.सीटी स्कॅनच्या अहवालात मेंदू आणि कवटीच्या खाली मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाले. रक्तस्त्रावामुळे मेंदूवर मोठा दाब निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णाची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत विलंब झाल्यास मेंदूला कायमस्वरूपी इजा होण्याचा तसेच जीवाला धोका निर्माण होण्याचा संभव असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे यांच्या पथकाने ‘डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी’ ही अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यासाठी आवश्यक उपचार करण्यात आले तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात आली. गंभीर अवस्थेतील रुग्णावर वेळ न दवडता करण्यात आलेल्या या तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत झाली. शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. साक्षी, डॉ. सुश्मिता यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर सातत्याने उपचार करण्यात आले. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांत रुग्णाची प्रकृती सुधारली आणि त्याने सामान्य स्थितीकडे वाटचाल सुरू केली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत संपूर्ण मोफत करण्यात आल्याने रूग्णाच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासाही मिळाला.

डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. या रुग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव व मेंदूवर दाब दिसून आला. त्यामुळे विलंब न करता डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील उपचार आणि सतत निरीक्षणामुळे रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली. – डॉ. श्रृती खंडागळे, निवासी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

ताज्या बातम्या

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी
जळगाव जिल्हा

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add