• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

६१ हजारांचा मुद्देमाल लंपास; चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 22, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

६१ हजारांचा मुद्देमाल लंपास; चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी जळगाव

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावात मध्यरात्री घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले ६१ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्मला यशवंत महाजन (वय ४८, व्यवसाय-शेती, रा. नवेगाव, मेहुणबारे, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कडी तोडून कपाटातील ऐवज लांबवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या मेहुणबारे येथील राहत्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात शिरून कपाटात ठेवलेले दागिने चोरले.

या चोरीमध्ये २८ हजार ६०० रुपये किमतीचा १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, २८ हजार ६०० रुपयांची १३ ग्रॅम वजनाची लहान सोन्याची साखळी आणि ४ हजार ४०० रुपयांचा २ ग्रॅम वजनाचा शुद्ध सोन्याचा तुकडा असा एकूण ६१ हजार ६०० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला.
अज्ञातावर गुन्हा दाखल

सकाळी घरफोडीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निर्मला महाजन यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नंदकिशोर महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

Next Post
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add