• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

पंटर पाठवून खात्री केल्यानंतर कारवाई; घरात वेश्याव्यवसायासाठी अनेक खोल्यांची व्यवस्था

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 21, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

पंटर पाठवून खात्री केल्यानंतर कारवाई; घरात वेश्याव्यवसायासाठी अनेक खोल्यांची व्यवस्था

फैजपूर | प्रतिनिधी

फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता ही कारवाई करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभागीय पोलिस कार्यालय, यावल पोलिस ठाणे आणि निंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

पंटर पाठवून केली खात्री

अकलूद येथील मनीषा प्रकाश झोपे (वय ४५) ही महिला संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत प्रथम पंटर पाठवून माहितीची खातरजमा केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिस पथकाने घरावर छापा टाकला.

घरात अनेक खोल्यांची व्यवस्था

छाप्यादरम्यान दुमजली घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी अनेक खोल्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली.
यातील तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर एक महिला भुसावळ येथीलच असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी कथित कुंटणखाना चालविणाऱ्या मनीषा झोपे हिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ताज्या बातम्या

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
खान्देश

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
जळगाव जिल्हा

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
खान्देश

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add