• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कामातील निष्काळजीपणा भोवला; जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कामातील निष्काळजीपणा भोवला; जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित

कामातील निष्काळजीपणा भोवला; जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित

जळगाव प्रतिनिधी

जळगाव: जळगाव मंडलातील वा   ढते रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाड, ६७ कोटी रुपयांहून अधिक थकीत वीजबिल आणि वीजचोरीच्या हजारो प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई न केल्याचा ठपका ठेवत महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी १९ ऑगस्ट रोजी हे निलंबनाचे आदेश जारी केले. या धडक कारवाईमुळे महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निलंबन आदेशानुसार, पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील चोपडा शहरी उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाला होता. तसेच, २०२६-२७ या वर्षासाठी रोहित्र नादुरुस्तीची स्वीकारार्ह मर्यादा ४.२० टक्के निश्चित करण्यात आली असताना प्रत्यक्षात हे प्रमाण १०.२६ टक्क्यांवर पोहोचले होते. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आलेले अपयश, जुलै २०२६ अखेर झालेली ६७ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आणि उघडकीस आलेल्या ३,१६४ वीजचोरीच्या प्रकरणांपैकी तब्बल २,१६९ प्रकरणांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करणे, या सर्व बाबी गंभीर गैरवर्तनात मोडत असल्याने ही कारवाई करण्यात आली. निलंबन काळात पाटील यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना नाशिक मुख्य अभियंता कार्यालयात आठवड्यातून दोनदा हजेरी लावावी लागणार आहे.


 

Next Post
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add