जळगाव, प्रतिनिधी : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त १९ ऑगस्ट रोजी जळगावातील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील छायाचित्रकारांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टच्या वतीने शहरातील पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य प्रतापभाऊ गुलाबराव पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सह्याद्री बिर्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचे अध्यक्ष रोहित अहुजा, सेक्रेटरी धनराज कासट, योगेश सांखला, दर्शन जैन, तरुणभाई यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

यावेळी कन्टेन ओशियनचे युवराज परदेशी, तुषार भामरे आणि रजत भोळे यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी जागतिक छायाचित्र दिनाचे महत्त्व तसेच छायाचित्रकारांच्या कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

छायाचित्रणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे योगदान देणाऱ्या जळगाव शहरातील पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. छायाचित्रकार हे समाजातील विविध घटना, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाला रुपेश महाजन, प्रकाश मुळे, लीलाधर अत्तरदे, संजय बोरसे, विजय बारी, सागर चौधरी, मुकेश निंबाळकर, विशाल महाजन, सचिन पाटील, योगेश गुरव, मयूर केसवानी, किशोर पाटील, संतोष बारी, गोकुळ बाविस्कर, प्रशांत सोनवणे, अप्पा वाणी, धरमेश गोसर यांच्यासह शहरातील अनेक फोटोग्राफर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. प्रकाश मुळे यांनी प्रास्ताविक केले, तर उदय बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहरातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी परिश्रम घेतले.









