• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्यदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य),  गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी मॅडम, तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्‍या सर्व महाविद्यालयाचे मान्यवर उपस्थीत होते.स्वातंत्र्य दिनी गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या वतीने  देशभक्तीपर गीत तसेच देशभक्तीपर भाषणे अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले.
 तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नवकल्पनांचे सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी नवभारत निर्मिती, विकसित भारत अभियान, या विषयांवर मते मांडली.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी नया भारत यांची काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. त्यात त्यांनी दूरदर्शी दृष्टीकोन अंतर्गत सांगताना स्वातंत्रतेच्या शतकात प्रवेश करणार्‍या देशाचा विकासशील आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासंदर्भात संदेश दिला. तसेच महाविद्यालयाबद्दल सांगताना उत्तरोत्तर झालेल्या प्रगतीचा आलेख नमूद केला.डॉ.उल्हास पाटील सर यांनी  स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्‍या सर्व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगताना गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता शैक्षणिक क्षेत्रातील गौरवशाली वाटचाल करीत आहे, व महाविद्यालय नवनवीन शिखरे काबीज करीत आहे तसेच महाविद्यालयाला वेगवेगळ्या क्षेत्रात मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. स्वतंत्रता दिना बद्दल सांगताना त्यांनी आजचा दिवस आपल्यासाठी केवळ उत्सव नाही तर नया भारत या ध्येयाच्या दिशेने एक मजबूत व प्रेरक पाऊलही आहे. आपला उद्देश २०४७ ला भारताला आत्मनिर्भर विकसित आणि सशक्त राष्ट्र म्हणून उभे करणे आहे, असे त्यांनी नमूद केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्टपणे सादरीकरण केल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.त्यानंतर डॉ. किरण पाटील (रेडिओलॉजिस्ट) तसेच अश्विनी दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी संकल्प अंतर्गत ओम शांती मंत्राचे उच्चारण केले. तसेच नशा मुक्त व व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आवाहन करताना विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इन्स्टिट्यूट, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग व मान्यवर उपस्थित होते.

 

Next Post
ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add