जळगाव, प्रतिनिधी : समाजाने केलेला सत्कार म्हणजे प्रोत्साहन असून हा अविस्मरणीय क्षण असतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा व समाजशील नागरिक बनावे असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले.

जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना बोरसे हे तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. गोपाल घोलप, सुभाष सोनवणे, दुध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, मनीषा सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे, सुभाष करे, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, डॉ.सिद्धांत घोलप, रमेश सुलताने, गणेश सैंदाणे, धरणगाव एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलिप धनगर, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, हिलाल सोनवणे, अहिल्या महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष प्रमिला कंखरे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तूळशीराम सोनवणे, विष्णू ठाकरे, दशरथ लांडगे, गणेश जाने, नागेश हाडपे, गोपाल देशमुख, नामदेव सावळे, प्रदीप न्हाळदे, पप्पू कंखरे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी भविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करा. समाज हितासाठी आपण काही देणं लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे असे आवाहन केले.

सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे व शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा, क्रीडा, उद्योग, तंत्रज्ञान व विविध क्षेत्रांत पुढे यावे. तसेच संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर तूळशीराम सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गुणवंतांचा झाला सत्कार !
यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर तसेच डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट जेईई व व अन्य स्पर्धात्मक परीक्षा मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदवीधर परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा सोनवणे, रामचंद्र चर्हाटे, अरुण ठाकरे, संतोष कचरे, तुळशीराम सोनवणे, डिगंबर धनगर, सुभाष खोमणे, महिंद्र सोनवणे, प्रवीण पवार, भारती ठाकरे, सुवर्णा धनगर, दिपक धनगर, डॉ. संजय पाटील, यशवंत शिरोळे, शरद न्हाळदे, अनिल मनोरे, पांडुरंग पवार, भरत न्हाळदे,मयुर ठाकरे, विलास न्हाळदे यांनी परिश्रम घेतले.









