• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 2, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

जळगाव, प्रतिनिधी : ररिक्षामध्येघरी सोडण्याचे आमिष दाखवून महिलेला रिक्षात बसविल्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद परिसरातून ताब्यात घेतले. आरोपींकडून २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रिक्षा, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास संबंधित महिला बाजार करून पायी घरी जात असताना दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिर परिसरात एक रिक्षा तिच्याजवळ आली. रिक्षाचालकाने ‘तुम्हाला घरी सोडतो’, असे सांगितल्याने महिला रिक्षेच्या मागील बाजूस बसली. त्यावेळी रिक्षेत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील अंदाजे २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली.

या घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.

तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच तांत्रिक तपास केला. त्याचबरोबर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मुकेरिया हॉटेल, नशिराबाद परिसरात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे वसीम शेरअली तेली (वय ३८, रा. झोपडीजवळ, फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (वय २६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (वय ३६, रा. साती मजार, नशिराबाद) अशी आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र, अंदाजे किंमत २५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रिक्षा किंमत १ लाख रुपये, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपासात ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी वसीम शेखअली तेली याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच वसीम अजमल खान याच्याविरुद्धही एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवं, उमाकांत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 

ताज्या बातम्या

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
जळगाव जिल्हा

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

October 2, 2026
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे
खान्देश

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

October 2, 2026
अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव
Uncategorized

अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add