• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

डॉ. केतकी पाटील फौंडेशन व कौशल्य रोजगार केंद्राचा संयुक्त उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. केतकीताई पाटील फौंडेशन व जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्र,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सरदार जी जी हायस्कूल च्या सहकार्याने ११ ऑगस्ट मंगळवार रोजी रावेर येथे रोजगार मेळावा घेण्यात आला. भर पावसातही या मेळाव्यात ११५ युवकांची नोंदणी झाली असून ४५ युवकांची प्राथमिक निवड झाली आहे.

रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूलच्या जिमखाना हॉल मध्ये आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे उदघाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रावेर नगराध्यक्षा संगीता महाजन, भाजपचे जेष्ठ नेते सुरेश धनके,माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, सरदार जी जी हायस्कुल चेअरमन संतोष अग्रवाल, विवरे माजी सरपंच वासुदेव नरवाडे, जळगाव पूर्वच्या भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा डॉ.केतकीताई पाटील फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकी पाटील, भाजप रावेर उत्तर मंडळाध्यक्ष रवींद्र पाटील, रोजगार कौशल्य केंद्राचे दिनेश चौधरी, डॉ संदीप पाटील, रावेर शिक्षण संस्थेचे देवेंद्र मिसर, उमेश महाजन, नगरसेवक दिलीप पाटील, राजू सुवर्णे, योगिता पाटील, सपना महाजन, अर्चना पाटील, राजेश शिंदे, अमोल पाटील, मनोज श्रावगे आदि मान्यवर उपस्थित होते.

रावेरच्या रोजगार मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव नरवाडे यांनी केले. यावेळी रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या जळगाव, चोपडा, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील सात नामांकित कंपन्याचे प्रतिनिधींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन सन्मानित केले.
या मेळाव्याला परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींनी भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रावेर परिसर आणि ग्रामीण भागातील एकूण ११५ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यात अधिकृत नोंदणी केली. यामध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुण-तरुणींचा समावेश होता. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. उमेदवारांचे कौशल्य आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ४५ मुलांची प्राथमिक निवड केली आहे. प्राथमिक निवड झालेल्या या तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी मिळवून देणारा हा पहिला स्तुत्य उपक्रम ठरला,असे मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले.


 

Next Post
सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add