• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 23, 2026
in महाराष्ट्र
0
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

सिंधुदुर्ग, (विशेष प्रतिनिधी) : येथील ​महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा आरोप करून सोशल मीडियावर सनसनाटी पसरवल्याप्रकरणी सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) पोलीस ठाण्यात ‘कोकणसाद’ यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण आणि ग्राहक प्रतिनिधी नंदन वेंगुर्लेकर यांच्याविरुद्ध रविवारी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

एका चर्चासत्रादरम्यान स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात असल्याचा हास्यास्पद व कपोलकल्पित दावा नंदन वेंगुर्लेकर यांनी केला होता. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ स्पष्टीकरण देऊनही, यूट्यूब संपादक सागर चव्हाण याने महावितरणचा खुलासा वगळून केवळ दिशाभूल करणारा २ ते ३ मिनिटांचा भाग सोशल मीडियावर प्रसारित केला.

​नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, गुन्ह्यास चिथावणी देणे, बदनामी करणे आणि शांततेचा भंग करणे याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार कलम ३५३ (१) (बी), ३५१ (३), ३५२ व ३५६ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, “स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात कोणताही कॅमेरा किंवा गोपनीयतेचा भंग करणारी यंत्रणा नाही; त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही खोट्या व अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.


 

Next Post
डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add