• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 13, 2026
in क्रिडा
0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट निवड चाचणीत जिल्ह्यातील तब्बल ८८ खेळाडूंची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) मान्यतेने ही निवड चाचणी ‘अनुभूती निवासी स्कूल’च्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर पार पडली. या चाचणीत जिल्ह्यातील तब्बल ३०० बाल क्रिकेटपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

​जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. निवड समितीचे अध्यक्ष संजय पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने खेळाडूंच्या कौशल्याचे निरीक्षण करून या ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड केली. याप्रसंगी निवड समितीचे निमंत्रक तथा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष बडगुजर, हितेश पटेल आणि सुयश बुरूकुल यांनी विशेष सहकार्य केले.

​दरम्यान, प्राथमिक फेरीत निवड झालेल्या या ८८ खेळाडूंची विविध संघांमध्ये विभागणी केली जाणार असून, त्यांच्यात १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावरच होतील. या सामन्यांमधील कामगिरीच्या आधारे जळगाव जिल्ह्याचा मुख्य संघ तयार करण्यासाठी अंतिम २५ खेळाडूंची निवड केली जाईल, अशी माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.

Next Post
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add