• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर

प्रशासनाला दिले कडक निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील डम्पिंग ग्राऊंडच्या अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या कामावर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन मामा देशमुख यांनी आज कचरा डेपोच्या (डम्पिंग) कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

पुण्यातील मोशी येथे डम्पिंग ग्राऊंडवर झालेली भीषण दुर्घटना आपल्याकडे घडू नये, यासाठी वेळीच खबरदारी घेण्याच्या आणि सुरक्षा उपाययोजना कडक करण्याच्या सूचना उपमहापौर व सभापतींनी उपस्थित मनपा प्रशासनाला व ठेकेदाराला दिल्या. तसेच संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा तात्काळ वेग वाढवण्याचे कडक निर्देश दिले.

​डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे आणि निघणाऱ्या विषारी धुरामुळे आजूबाजूच्या खेड्यांमधील तसेच मनपा क्षेत्रातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून, परिसरात त्वचेचे विकार (स्किन इन्फेक्शन) आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण आढळून येत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. नागरिकांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.

​या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात लोकप्रतिनिधींसोबत मनपाचे आरोग्य उपायुक्त निर्मला गायकवाड, आरोग्य सहाय्यक समीर बोरवले, पर्यावरण अधीक्षक प्रकाश पाटील, अभियंता विशाल सुर्वे, रॉयल वेस्टचे सुपरवायझर विशाल पाटील आणि श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे सुपरवायझर आदी अधिकारी व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी परिसरातील त्रस्त नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रशासनाने कामात दिरंगाई न करता लवकरात लवकर नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे.


 

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

August 27, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 27, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 27, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add