• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!

सांधेदुखी, कंबरदुखीवर दिलासा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 18, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!

जळगाव, (प्रतिनिधी) : बदलती जीवनशैली, वाढते शारीरिक श्रम आणि चुकीच्या बसण्याच्या सवयींमुळे आज अनेक नागरिक सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सायटिका, स्पॉन्डिलायटिस तसेच स्नायूंच्या ताणाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. अशा विकारांवर आयुर्वेदातील स्नेहन व स्वेदन हे उपचार प्रभावी ठरत असून आता ही सुविधा जळगाव खुर्द येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

आयुर्वेदातील पंचकर्म उपचारांपूर्वी शरीराची योग्य तयारी करण्यासाठी स्नेहन व स्वेदन उपचारांना विशेष महत्त्व आहे. स्नेहन प्रक्रियेमध्ये औषधी तेलांचा वापर करून शरीराला अभ्यंग दिला जातो, तर स्वेदन प्रक्रियेद्वारे शरीराला उष्णता देऊन स्नायू व सांधे शिथिल केले जातात. या संयुक्त उपचारामुळे शरीरातील कडकपणा कमी होऊन वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.तज्ज्ञांच्या मते, स्नेहन व स्वेदन उपचारांमुळे शरीर हलके, उत्साही आणि स्फूर्तीदायक वाटते. सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, वातविकार, सायटिका तसेच स्नायूंचा ताण यामध्ये हे उपचार विशेष लाभदायक ठरतात.

नियमित उपचारांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना आराम मिळतो आणि दैनंदिन कामकाज अधिक सहजतेने करता येते. रुग्णालयात अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार सुरक्षितपणे केले जात असून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार उपचार पद्धती निश्चित केली जाते. नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम, स्फूर्ती व नवचैतन्य देणारे हे उपचार अनेक रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत.सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी किंवा वातविकारांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्नेहन व स्वेदन उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!

June 18, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!
शैक्षणिक

गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!

June 18, 2026
जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा
जळगाव जिल्हा

जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
राजकीय

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी
जळगाव जिल्हा

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group