• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान ‘राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा’; १५ जूनपासून प्रारंभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान ‘राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा’; १५ जूनपासून प्रारंभ

​जामनेर, (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ते १७ जून २०२६ या कालावधीत “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक यात्रा राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात यात्रेबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.

​जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथून या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील माँसाहेबांच्या समाधीस्थळी या यात्रेची सांगता होईल. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा व कार्याचा जागर करणे, शिवचरित्राचा प्रचार करणे आणि स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा महाराष्ट्रातील विविध भौगोलिक भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचा एक अनोखा संदेश देणारी ठरणार आहे. या ऐतिहासिक यात्रेत महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी व शिवकार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

​जळगाव जिल्ह्यातील तसेच जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, युवक, महिला व सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन यात्रेचे समन्वयक राहुल चव्हाण व कैलास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ताज्या बातम्या

सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान ‘राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा’; १५ जूनपासून प्रारंभ
जळगाव जिल्हा

सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान ‘राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा’; १५ जूनपासून प्रारंभ

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
जळगावकरांना वीज संकटातून मुक्त करा; उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींचे महावितरणसह मनपा प्रशासनाला आदेश
जळगाव जिल्हा

जळगावकरांना वीज संकटातून मुक्त करा; उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींचे महावितरणसह मनपा प्रशासनाला आदेश

June 11, 2026
लग्नातील वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; पोलिसात ८ जणांवर गुन्हे दाखल!
गुन्हे

लग्नातील वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; पोलिसात ८ जणांवर गुन्हे दाखल!

June 10, 2026
जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

June 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group