• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

१६ शहरांतील संघांमध्ये रंगणार ३१ सामने!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 9, 2026
in क्रिडा, सामाजिक
0
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

​भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील नेवे-वाणी समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी भव्य ‘बॉक्स क्रिकेट स्पर्धा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावल रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सकाळी ६:०० वाजेपासून या क्रीडा महोत्सवाला सुरुवात होणार असून, यात एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत.

​समाजातील युवा खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे आणि सर्व समाजबांधवांमध्ये आपुलकी व एकतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १४ जून रोजी सकाळी ठीक ६:०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे शानदार उद्घाटन होईल. संपूर्ण दिवसभर क्रिकेटचा रोमांचक थरार अनुभवायला मिळणार असून, रात्री ८:०० वाजता बक्षीस वितरण समारंभाने या स्पर्धेचा समारोप केला जाईल.

​विविध राज्यांतून संघांची नोंदणी..
या स्पर्धेला महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरून देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेत एकूण १६ शहरांतील संघ सहभागी होत असून, यामध्ये महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, साकळी, यवतमाळ, पुणे, रिंगणगाव, चुंचाळे, यावल आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. तसेच इतर राज्यांतून बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) आणि सुरत (गुजरात) येथील मातब्बर संघही आपले नशीब आजमावण्यासाठी दाखल झाले आहेत.

​सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन..
“या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण समाज एका छताखाली येत आहे. हा केवळ खेळ नसून समाजबांधवांना एकत्र आणणारा सोहळा आहे. तरी भुसावळ व परिसरातील सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब, सहपरिवार दिवसभर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा,” असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किशोर नेवे, उपाध्यक्ष दिपक नेवे, सचिव राम माहूरकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा विनीता सुनिल नेवे, उपाध्यक्षा अंजली प्रशांत नेवे, सचिव पुजा उदय नेवे व समस्त नेवे-वाणी समाज मंडळ, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add