• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

राष्ट्रवादी युवती काँग्रेस व शिवशक्ती फाउंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 2, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहचविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील भोकर येथे एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि शिवशक्ती युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी’ या अभियानांतर्गत गावातील ७५ लाभार्थ्यांना आरोग्य तपासणीसह गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

​माजी मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा शिवशक्ती युवा फाउंडेशनच्या अध्यक्षा इंजि. मोनालिका पवार यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवर अतिथी सुधाकर पवार यांच्या हस्ते भोकर गावातील ७५ लाभार्थ्यांना गृहपयोगी संच, कामगार कार्ड आणि सेफ्टी किटचे यशस्वी वितरण करण्यात आले.

गृहपयोगी वस्तूंच्या वाटपासोबतच उपस्थित ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. ​कार्यक्रमादरम्यान इंजि. मोनालिका पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधत विविध कल्याणकारी शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली आणि ग्रामीण भागातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

​या लोकोपयोगी उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुधाकर पवार, किशोर पवार, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक पाटील, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, सुकदेव बाविस्कर, राज पवार, ललित बाविस्कर, योगेश कोळी, जयश्री पवार तसेच भोकरच्या पोलीस पाटील हेमलता पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिवशक्ती फाउंडेशन आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या या सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

Next Post
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add