• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान; हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 14, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

जामनेर, प्रतिनिधी : साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने आयोजित ‘जागर दुर्गाशक्तीचा’ या कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे यांनी तरुणाईसमोरील गंभीर सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य केले. तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता, मुलींच्या पलायनाचे वाढते प्रमाण, मोबाईल न मिळाल्याने टोकाचे निर्णय घेण्याच्या घटना तसेच तरुणांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि खुनांच्या घटनांबाबत समाजाने गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव तरुणाईला व्हावी, या उद्देशाने हंकारे यांनी आई आणि वडिलांचे जीवनातील महत्त्व भावनिक शब्दांत उलगडून सांगितले. वडिलांचे कष्ट, त्याग आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी घेतलेले अपार परिश्रम यांची जाणीव करून देताना त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. आईचे प्रेम, तिचा त्याग आणि तिचे आयुष्यातील अनमोल स्थान समजावून सांगताना सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आपल्या कुटुंबाप्रती असलेली कर्तव्ये ओळखून जबाबदारीने वागावे, असा संदेश त्यांनी दिला.

नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान..
कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत संघर्षातून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील या नऊ दुर्गांचा सन्मान करून प्रतिष्ठानने महिलांच्या कष्टांचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला.

यावेळी ६४ समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, श्याम चैतन्य महाराज उपस्थित होते. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघ आणि जगदीश बैरागी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाना सातवे, ईश्वर पवार, डॉ. विनोद भोई, ईश्वर चवरे, जितेंद्र कुमावत, संतोष सोनवणे, मयूर पवार सर, गणेश चौधरी, शुभम निकम, अनमोल माळी, जयवंत पर्वते, ईश्वर चौधरी, शंकर सातवे, भारत ठाकरे तसेच श्री मॉर्निंग ग्रुपचे सहकार्य लाभले.

जामनेर शहरातील सर्व समाजाने या कार्यक्रमाला गांभीर्याने घेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले.सामाजिक प्रश्नांवर जागृती, पालकांविषयी कृतज्ञतेची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ‘जागर दुर्गाशक्तीचा’ या उपक्रमाने जामनेरमध्ये सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला.

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add