• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

२५ जणांवर तातडीचे मोफत उपचार!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 23, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पीटलमध्ये हृदयरोग मुक्त जिल्हा अभियानांतर्गत भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हॉस्पिटलच्या तत्पर व अत्याधुनिक हृदयरोग विभागामुळे अनेक रुग्णांसाठी हे हॉस्पिटल जीवनसंजीवनी ठरत आहे.

मंत्री गिरीष महाजन यांनी वाढदिवस सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महादेव हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुढील एक महिनाभर हृदयरोग तपासणी शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी २डी इको, ईसीजी, एन्जिओग्राफी तसेच एन्जिओप्लास्टी संदर्भात मोफत तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अल्पावधीतच ५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, अनेक रुग्णांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, योजनेअंतर्गत २५ रुग्णांवर तातडीने मोफत उपचार करण्यात आले असून, योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रसिद्ध डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांची टीम मनोभावे सेवा देत आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, अचूक निदान आणि तत्पर उपचार यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आकाशवाणी चौक येथे सुरू असलेल्या महादेव हॉस्पीटलमध्ये विविध आजारांवरील योजना व कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित डॉक्टरांची टीम आणि रुग्णसेवेची तळमळ यामुळे हे हॉस्पीटल अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन करत आहे.

रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांना नवजीवन मिळणे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे, असे मत हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी व्यक्त केले.

Next Post
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add