• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

शहरातील आरोग्य सेवेने आणखी एक आधुनिक टप्पा गाठला, टॉन्सील शस्त्रक्रिया होणार सोप्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आरोग्य सेवेत आणखी एक आधुनिक टप्पा गाठत डॉ. उल्हास पाटील रूग्णालय आणि महादेव रूग्णालय येथे अत्याधुनिक कोब्लाटर मशीन उपलब्ध झाले आहे. नाक-कान-घसा विभागातील शस्त्रक्रियांना अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक बनविण्यासाठी ही तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.

कोब्लेशन तंत्रज्ञानावर आधारित हे मशीन टॉन्सिल्स, अ‍ॅडेनॉइड्स तसेच इतर सॉफ्ट टिश्यू काढण्यासाठी वापरले जाते. पारंपरिक शस्त्रक्रियांपेक्षा या पद्धतीत अनेक फायदे मिळतात. ऑपरेशनदरम्यान रक्तस्राव अत्यल्प होतो, त्यामुळे रुग्णाची जोखीम कमी होते. तसेच ऑपरेशननंतर वेदना तुलनेने कमी जाणवतात, जखम लवकर भरून येते आणि रुग्णाची रिकव्हरी जलद होते. या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आसपासच्या निरोगी टिश्यूला कमी नुकसान होते. त्यामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते आणि गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. परिणामी, रुग्णांना कमी कालावधीतच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो.

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, या आधुनिक यंत्रणेमुळे शस्त्रक्रिया अधिक प्रभावीपणे करता येणार असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. तरी नागरिकांनी व रुग्णांनी या अत्याधुनिक कोब्लाटर तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Next Post
जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add