• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 30, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सी आणि वरणगाव येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर लंपास केले होते. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

​एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास चक्र फिरवले. या तपासाअंती शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा) आणि चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी दोन्ही ठिकाणच्या चोरीची कबुली दिली आहे.

​हस्तगत केलेला मुद्देमाल:
​भरलेले ६२ सिलेंडर (किंमत १,५५,०००/-) तसेच ९५ रिकामे सिलेंडर (किंमत १,४२,५००/-) आणि ​एक मोपेड गाडी (किंमत १,३०,०००/-) असा एकूण ४,२७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​आरोपींना पुढील तपासासाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


 

Tags: #gas silenderCrimeJalgaonPolice
Next Post
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add