• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!

​भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील बस स्थानकातून एसटी बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेची सव्वा तीन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास करणाऱ्या महिला आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तिच्याकडून २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ बस स्थानकातून चोपडा बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरी केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पथकातील कर्मचारी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा करत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे कुलसुम्बी मुश्ताक शेख (रा. यावल) या संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेली ३ लाख २० हजार रुपयांची सोन्याची पोत हस्तगत केली आहे. या यशस्वी कारवाईत डी.बी. पथकाचे विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अठाडे, दिलीप कोल्हे, जिवन कापडे, हर्षल महाजन आणि शिल्पा राठोड यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस नाईक कांतीलाल केदारे करत आहेत.

Next Post
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित
जळगाव जिल्हा

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group