• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

​जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असतानाच, आता पोलीस दलातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ९ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयांतर्गत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे हे अनुभवी आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला आहे. जळगाव जिल्ह्याचा विस्तार आणि गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता, ढिवरे यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला मोठा फायदा होईल आणि पोलीस प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली होती. ​जळगावच्या नूतन अधीक्षकांच्या आगामी कार्यकाळाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीकांत ढिवरे लवकरच आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
​

Tags: #DSP#jalgaon_city#jalgaondistrict#shrikant dhivarePolice
Next Post
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add