• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ‘समन्वय २०२६’ या सांस्कृतिक सप्ताहाची मोठी धूम पाहायला मिळत आहे. या महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘टीचर्स ज्युनिअर नाईट’मध्ये डॉक्टरांच्या कलाविष्काराने सर्वांची मने जिंकली. विशेषतः माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी सादर केलेल्या ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ या अजरामर गीताने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

​सांस्कृतिक सप्ताहाचा थाटात प्रारंभ..
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ‘आग्नेय’ बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत ‘समन्वय २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी महाविद्यालयाच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. सी. कांते, डॉ. गुणवंतराव सरोदे आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

​डॉक्टरांच्या सुरांनी रंगली रात्र..
दैनंदिन वैद्यकीय सेवेच्या धावपळीतून वेळ काढत डॉक्टरांनी आपल्यातील कलाकार या व्यासपीठावर सादर केला. डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत द्विगुणित केली. त्यांच्या या सादरीकरणाला विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

​विद्यार्थ्यांचा विविध कलाविष्कार..
यावेळी केवळ शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांनीही नृत्य, गायन आणि अभिनयाचे सादरीकरण करत आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. गुरु-शिष्यांच्या या अनोख्या ‘टीचर्स ज्युनिअर नाईट’मुळे महाविद्यालयाचे वातावरण उत्साही आणि चैतन्यमय झाले होते. सप्ताहात विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, ‘आग्नेय’ बॅचचे विद्यार्थी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.


 

Next Post
जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

ताज्या बातम्या

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

नशिराबादजवळ डंपर व ट्रकची भीषण धडक; ट्रकचालकाचा मृत्यू, महामार्ग तीन तास ठप्प

October 30, 2026
कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!
खान्देश

कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!

October 30, 2026
‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ प्रभाग १२ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी
जळगाव जिल्हा

‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ प्रभाग १२ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी

October 30, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या
जळगाव जिल्हा

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add