• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गावठी कट्टा आणि धारदार कोयत्यासारखी घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एम.आय.डी.सी. पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा, रिकामी मॅगझीन आणि मोटारसायकलसह एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दोन तरुण घातक शस्त्रांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तात्काळ कासमवाडी, नेरी नाका आणि स्मशानभूमी परिसरात सापळा रचला. नेरी नाका रोडवरील एकता चौक परिसरातील मोकळ्या मैदानात एक विनाक्रमांक मोटारसायकल पोलिसांना येताना दिसली. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, आरोपींनी वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

संशयितांची अंगझडती घेतली असता, एकाच्या कमरेला गावठी बनावटीचा कट्टा आणि दुसऱ्याकडे लोखंडी धारदार कोयता व कट्ट्याची रिकामी मॅगझीन मिळून आली. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमवाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. मेस्का माता नगर) अशी सांगितली.

या कारवाईत पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, ५० हजार रुपयांची बजाज पल्सर मोटारसायकल, धारदार कोयता आणि मॅगझीन असा एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, किरण चौधरी, रमाकांत साळुंखे आणि शशिकांत मराठे यांच्या पथकाने केली.

Next Post
जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड

जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add