• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 3, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकातील एका ट्रॅव्हल्स ऑफिससमोरून कुरिअरचे बॉक्स चोरी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला (अल्पवयीन मुलगा) जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ९६ हजार ९९६ रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ४ महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.


​आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून ५ मोबाईल असलेले कुरिअरचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तपास पथक तयार केले होते.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एका अल्पवयीन मुलावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याने चोरून नेलेले ४ मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले.


​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोह महेंद्र पाटील, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, प्रविण जाधव, प्रशांत लाड आणि चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोह महेंद्र पाटील करत आहेत.


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल

फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add