• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

​जळगाव, (प्रतिनिधी) : मार्च महिन्यातच जळगावचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. या भीषण उष्णतेचा सर्वाधिक फटका रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि पशू-पक्ष्यांना बसत असून, पाण्यासाठी त्यांची भटकंती होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मुनोत यांनी भूतदयेच्या भावनेतून जलकुंड आणि परळ मोफत वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

​पाण्याची सोय आणि सावलीचीही काळजी..
​या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात एकूण १५० जलकुंड आणि ५० परळ मोफत वितरित केले जाणार आहेत. केवळ पाणी उपलब्ध करून देऊन न थांबता, रमेशकुमार मुनोत यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नागरिकांनी हे जलकुंड किंवा परळ उन्हात न ठेवता सावलीच्या ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून पाणी थंड राहील आणि पशू-पक्ष्यांना तिथे विसावा मिळेल.” विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी नैसर्गिक सावली उपलब्ध नाही, तिथे सावलीसाठी मुनोत यांच्याकडून बॅनरची सुविधाही दिली जाणार आहे.

​नोंदणी आणि वितरणाची माहिती..
​हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी इच्छुक नागरिकांनी ९३२५९२२३०५ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करावी. ​’जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप सोमवार, दि. २३ मार्चपासून वाटप सुरू होईल. ​वाढत्या उन्हात मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, अशी विनंती रमेशकुमार मुनोत यांनी केली आहे.

Next Post
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

ताज्या बातम्या

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!
राजकीय

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!

May 4, 2026
शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी
गुन्हे

शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

May 4, 2026
पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी
आरोग्य

पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

May 4, 2026
जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group