• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 19, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

​जळगाव, (प्रतिनिधी) : सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तूंचे आमिष दाखवून देशभरातील लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांमध्ये आज पहाटे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या ताफ्याने एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांच्या भाषेत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धडक मोहिमेत अनेक अट्टल आरोपींना मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा ही कमी लोकसंख्या असलेली गावे गेल्या काही वर्षांपासून विशिष्ट गुन्ह्यांमुळे चर्चेत आली होती. या गावांमधून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, जुने सोने, दुर्मिळ शंख आणि डबल इंजिन अशा वस्तूंचे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असत. या आमिषाला भुलून जेव्हा लोक या भागात येत, तेव्हा त्यांना बनावट नोटा किंवा खोट्या वस्तू दाखवून लाखो रुपयांना फसविले जाई. प्रतिकार करणाऱ्यांना मारहाण करून लुटले जायचे, तसेच पीडितांना वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन तक्रार करण्यापासून रोखले जात होते. गेल्या तीन वर्षांत या परिसरात दरोडा, खून, जबरी चोरी आणि फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

​या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज १९ जून २०२६ रोजी पहाटे पोलिसांनी धाडसत्र राबवले. या कारवाईत पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा समावेश आहे.

​कारवाईत जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल:
​रोख रक्कम: एकूण २० लाख रुपये.
​सोने-चांदी: ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ३० लाख रुपये) आणि ४ किलो चांदीचे दागिने (अंदाजे किंमत ८ लाख रुपये).
​शस्त्रास्त्रे: २ गावठी कट्टे (रिव्हॉल्व्हर व पिस्तूल) आणि ३ जिवंत काडतुसे.
​प्राण्यांचे कातडे: १ हरणाचे, १ कोल्ह्याचे आणि १ सशाचे कातडे.
​वाहने व इतर: ४ चारचाकी वाहने, ६ दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन.
​बनावट नोटा: चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडियाच्या १०० रुपयांच्या नोटांचे २ बंडल.

​या यशस्वी मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ/मुक्ताईनगर प्रभारी) केदार बारबोले, परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राहुल गायकवाड आणि विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


 

Tags: CrimeJalgaonmuktainagarPolice
Next Post
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

विकसित भारत रोजगार योजना' अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add