• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

वरणगाव, (प्रतिनिधी) : वैद्यकीय सेवा देतानाच सामाजिक आणि राष्ट्रीय जनजागृतीची जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडणारे वरणगाव येथील वासुदेव नेत्रालय पुन्हा एकदा आपल्या अभिनव उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. नेत्रालयाचे संचालक डॉ. नितू पाटील आणि डॉ. सौ. रेणुका पाटील यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ओपीडी केस पेपरच्या मागील कोऱ्या बाजूचा उपयोग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील १२ वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत ओपीडी पेपरच्या मागील कोऱ्या भागावर मोदी सरकारच्या विविध ऐतिहासिक निर्णयांची माहिती छापण्यात आली आहे. यामुळे कागदाचा अपव्यय टाळण्यास मदत होत असून रुग्णांना उपचारांसोबतच राष्ट्रीय घडामोडींची माहितीही सहज उपलब्ध होत आहे.

नेत्रालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या हाती हा माहितीपर ओपीडी पेपर पोहोचत असल्याने या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. विशेष म्हणजे, हॉस्पिटलमधील अनेक पत्रके व चिठ्ठ्यांच्या मागील बाजू कोऱ्याच राहतात. त्याच कोऱ्या जागेचा विधायक वापर करून समाजप्रबोधनाचे कार्य करण्याचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

या माहितीपत्रकावर पंतप्रधान जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, वस्तू व सेवा कर (GST), आयुष्मान भारत योजना, कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारणी, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), डिजिटल इंडिया, उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLI) यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी वासुदेव नेत्रालयाच्या टीमचे अभिनंदन केले. समाजप्रबोधनासाठी नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचार आणि जागरूकता निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. नितू पाटील यांनी सांगितले की, “रुग्णांची सेवा करत असताना समाजात सकारात्मक संदेश पोहोचविणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करून जनजागृती घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

सामाजिक जनजागृतीचा ‘वासुदेव पॅटर्न’!
वासुदेव नेत्रालयाने सामाजिक जनजागृतीसाठी राबविलेला हा पहिलाच उपक्रम नाही. यापूर्वीही विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देण्याचे काम नेत्रालयाने केले आहे. ‘एकही फूलराणी आता जळणार नाही’, ‘जल प्रतिज्ञा’, ‘अवयवदान – जीवनदान’, ‘विश्वभरातील श्रीराम भक्तांना निवेदन’ यांसारख्या विविध विषयांवर पत्रकांद्वारे जनतेशी थेट संवाद साधण्यात आला होता. समाजहिताचे विषय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याची ही परंपरा वासुदेव नेत्रालयाने सातत्याने जपली असून त्यातूनच ‘वासुदेव पॅटर्न’ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.


 

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add