जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या राजकारणात अनेक चेहरे आले आणि गेले, पण गेल्या काही वर्षांपासून एक नाव सातत्याने चर्चेत आणि जनतेच्या हृदयात घर करून आहे, ते म्हणजे आमदार सुरेश दामू भोळे, ज्यांना संपूर्ण जळगाव ‘राजू मामा’ या नावाने प्रेमाने ओळखते. केवळ निवडणूक आली की दर्शन देणारे नेते आपण अनेक पाहिले असतील, पण बारा महिने आणि २४ तास जनतेच्या सुख-दुखात सामील होणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजू मामांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा ‘लोकनेता’..
राजू मामांच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांचा ‘डाउन टू अर्थ’ स्वभाव. मग तो एखादा भव्य लग्नसोहळा असो, धार्मिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कुटुंबावर ओढवलेला दुखाचा डोंगर (शोकसभा) असो, मामांची उपस्थिती तिथे अनिवार्य असते. प्रोटोकॉलची भिंत ओलांडून ते थेट सामान्यांमध्ये मिक्स होतात, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य गमक आहे.
लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत ‘डायरेक्ट कनेक्ट’..
राजू मामांचा जनसंपर्क केवळ एका विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित नाही. लहान मुलांशी गप्पा मारण्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेण्यापर्यंत त्यांचा दांडगा व्यासंग आहे. मतदारसंघात त्यांचा असलेला ‘वन-टू-वन टच’ हा इतर नेत्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहे.
२४ तास उपलब्ध: ‘कॉल करा, मामा हजर’..
आजच्या काळात जिथे बड्या नेत्यांचे फोन त्यांचे स्वीय सहाय्यक (PA) उचलतात, तिथे आमदार सुरेश भोळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा फोन २४ तास सुरू असतो. सामान्य नागरिक कोणत्याही वेळी त्यांना थेट फोन करू शकतो आणि मामा देखील तितक्याच तत्परतेने प्रत्येकाचा फोन स्वीकारतात. “माझा प्रतिनिधी माझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे,” ही भावना जळगावकरांमध्ये प्रबळ आहे.
निवडणुकीत ‘मॅजिक फिगर’मागील खरे कारण..
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जळगाव शहरातून जे प्रचंड मताधिक्य मिळाले, त्याचे श्रेय राजकीय विश्लेषक थेट राजू मामांच्या जनसंपर्काला देतात. मतदारांशी केवळ निवडणुकीपुरता संपर्क न ठेवता, वर्षभर त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळेच मतपेटीतून ‘कमळाला’ भरघोस यश मिळत आले आहे.
महानगरपालिकेच्या रणांगणात भाजपाची सरशी?
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, सुरेश भोळे यांच्या अफाट जनसंपर्कामुळे भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत सोपी मानली जात आहे. संघटन कौशल्य आणि वैयक्तिक गाठीभेटींच्या जोरावर मामांनी कार्यकर्त्यांचे जे जाळे विणले आहे, त्याचा थेट फायदा भाजपाला आगामी काळात होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून ते समाजसेवेचे माध्यम आहे, हे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. जळगाव शहराच्या विकासकामांसोबतच ‘माणसं जोडण्याची कला’ आत्मसात असलेला हा नेता आगामी काळातही जळगावच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल, यात शंका नाही.








