• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव भाजपमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’; २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा दणका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 8, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव भाजपमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’; २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी!

​जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीचा मोठा बडगा उगारला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी तब्बल २७ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या धडक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

​शिस्तभंगाचा ठपका..
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान पक्षाची धोरणे आणि वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयांचे उल्लंघन केल्याचे या २७ जणांच्या बाबतीत दिसून आले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणे किंवा संघटनात्मक कार्यात अडथळा आणणे, यांसारख्या बाबी कोअर कमिटीच्या निदर्शनास आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन, या सर्व बंडखोरांचे प्राथमिक सदस्यत्व आणि पदे तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

​”पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त आमच्यासाठी सर्वोच्च आहे. शिस्तीचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा निर्णय पक्ष मजबुतीसाठी घेण्यात आला असून तो तात्काळ लागू करण्यात आला आहे.”
— दीपक सूर्यवंशी, (महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप जळगाव)

​पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेले पदाधिकारी:
१. पाटील संगीता गोकुळ
२. हर्षदा अमोल सांगोरे
३. बाविस्कर धनश्री गणेश
४. बाविस्कर गणेश दत्तात्रय
५. सपकाळे रंजना भरत
६. कांचन विकास सोनवणे
७. शिंपी प्रमोद शांताराम
८. सपकाळे भरत शंकर
९. बागरे हिरकणी जितेंद्र
१०. चौधरी चेतना किशोर
११. बारी मयूर श्रावण
१२. पाटील तृप्ती पांडुरंग
१३. पाटील सुनील ज्ञानेश्वर
१४. विकास प्रल्हाद पाटील
१५. भोळे गिरीश कैलास
१६. कैलास बुधा पाटील (सूर्यवंशी)
१७. हेमंत सुभाष भंगाळे
१८. जितेंद्र भगवान मराठे
१९. प्रिया विनय केसवानी
२०. चौधरी रूपाली स्वप्नील
२१. अंजू योगेश निंबाळकर
२२. चौथै मयुरी जितेंद्र
२३. वंजारी जयश्री गजानन
२४. पाटील ज्योती विठ्ठल
२५. घुगे उज्वला संजय
२६. ढाकणे दिनेश मधुकर
२७. मोरे कोकीळा प्रमोद


 

Tags: #elections#jalgaon_city#municipalcorporationBjp
Next Post
प्रभाग १३ (ड) मध्ये महायुतीचे पारडे जड; प्रफुल्ल देवकरांना दोन अपक्ष उमेदवारांचा जाहीर पाठिंबा

प्रभाग १३ (ड) मध्ये महायुतीचे पारडे जड; प्रफुल्ल देवकरांना दोन अपक्ष उमेदवारांचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add