• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 17, 2026
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्राध्यापक डॉ. बापूराव बीटे यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आयोजित वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम (एसीएमसी) हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.

हा अभ्यासक्रम मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय, परळ या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगच्या नोडल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, मूल्यमापन तंत्र, अभ्यासक्रम नियोजन, प्रभावी अध्यापन कौशल्ये तसेच वैद्यकीय शिक्षणातील विविध नवकल्पनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय पोस्टर सादरीकरणाच्या माध्यमातून सहभागी डॉक्टरांना आपले शैक्षणिक अनुभव व संशोधन मांडण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमात डीन डॉ. अजय भांडारवार, डॉ. संतोष साळगरे, नोडल सेंटरचे समन्वयक डॉ. प्रवीण अय्यर, डॉ. राखी त्रिपाठी, डॉ. मुनीरा हिरकानी, डॉ. संतोष धोढी यांच्यासह अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांनीही या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. बापूराव बीटे यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणातील नवीन अध्यापन तंत्र, नेतृत्व विकास आणि विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. नेतृत्व शिकणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. या संकल्पनेनुसार सतत शिकत राहणे आणि शिक्षणात गुणवत्ता वाढविणे हेच या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहकारी, प्राध्यापक आणि व्यवस्थापनाने डॉ. बापूराव बीटे यांचे अभिनंदन केले.

Next Post
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add