• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची उल्लेखनीय कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 18, 2026
in आरोग्य
0
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

जळगाव, (प्रतिनिधी) : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या आणि यापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेल्या २४ वर्षीय गर्भवती महिलेची अत्यंत जोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या करून आई व बाळाचे प्राण वाचवले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून आणि वेळेवर दिलेल्या उपचारांमुळे ही प्रसूती यशस्वी झाली.

कल्पना (बदललेले नाव) या २४ वर्षीय महिलेवर यापूर्वी गंभीर हृदयविकारामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा स्थितीत त्या गर्भवती राहिल्याने संपूर्ण गर्भधारणेचा कालावधी अत्यंत जोखमीचा मानला जात होता. दरम्यान, त्यांना हृदयाचा त्रास, पाठीचे दुखणे तसेच पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी महिलेची तपासणी केली. त्यानंतर मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मत जाणून घेत हृदयाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले. हृदयाची पूर्वीची शस्त्रक्रिया आणि सध्याची प्रकृती लक्षात घेता प्रसूतीदरम्यान आईच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश या टिमने प्रसूतीची सविस्तर योजना तयार केली.

त्यानुसार आई व गर्भाच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, मेडिसीन विभाग आणि प्रशिक्षित परिचारिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्यंत काळजीपूर्वक प्रसूती करण्यात आली. अखेर ही जोखमीची प्रसूती यशस्वी ठरली आणि आईसह बाळाची प्रकृती स्थिर राहीली. रुग्णाच्या नातेवाईकांनीही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले. अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी दाखविलेली तत्परता, अचूक निर्णयक्षमता आणि तज्ज्ञ उपचारांमुळे आई आणि बाळाला नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

◾हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूती ही नेहमीच उच्च जोखमीची असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपचार यामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असून आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
– डॉ. प्राजक्ता पाटील,
डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

ताज्या बातम्या

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add