• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतीचे अवशेष ‘कचरा’ नव्हे, ‘उत्पन्न’! जैन इरिगेशन उभारणार देशातील सर्वात मोठा बायोचार प्रकल्प

शेतातील अवशेषांपासून बायोचार, स्वच्छ ऊर्जा आणि अतिरिक्त उत्पन्न; जैन इरिगेशनच्या संवादसत्रात शाश्वत शेतीची दिशा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 22, 2025
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा
0
शेतीचे अवशेष ‘कचरा’ नव्हे, ‘उत्पन्न’! जैन इरिगेशन उभारणार देशातील सर्वात मोठा बायोचार प्रकल्प

जळगाव, (प्रतिनिधी) : शेतीत निर्माण होणारे पिकांचे अवशेष हा कचरा नाही तर ते एक उत्पन्नाचे मोठे साधन होऊ शकते. पर्यावरण संवर्धनासोबतच देशासाठी महत्त्वाचे असणारे कार्बन क्रेडीट त्यातून कमाविता येऊ शकतात. शेतातील जैविक कोळसा म्हणजे बायोचार होय. शाश्वत शेतीसह शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, यासाठी कंपनीकडून उभारण्यात येणारा ‘जैन औद्योगिक बायोचार प्रकल्प’ देशात अग्रसेर ठरेल, असा सूर जैन हिल्स येथे झालेल्या बायोचार प्रकल्पाच्या सल्लामसलत संवादसत्रातून शुक्रवारी (ता.२१) निघाला.

जैन हिल्स येथील बडी हंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण भोसले, मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बाहेती, कापूस संशोधक गिरीष चौधरी, संशोधक गणेश देशमुख, शेतकरी प्रतिनिधी किशोर चौधरी, सुधाकर येवले, लता बारी उपस्थित होते.

यावेळी पंचक्रोशितील शेतकरी, अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फूडचे संचालक अथांग जैन यांनी ऑनलाईन संवाद साधला. प्रकल्पामागील भूमिका त्यांनी मांडली. जैन इरिगेशनचा परिचय, उद्दिष्टे, ध्येयदृष्टिकोन, शाश्वत शेतीबाबत बांधिलकी तसेच बायोचार प्रकल्पाविषयी माहिती त्यांनी दिली. ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ या श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच हा प्रकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकेल, अशी अपेक्षा अथांग जैन यांनी व्यक्त केली.

या प्रकल्पात आंब्याच्या कोया, मक्याचे भुट्टे, कापसाच्या काड्या यासारख्या शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील अवशेषांचा वापर करून बायोचार तयार केला जातो. यामुळे उघड्यावर कचरा जाळण्यामुळे तयार होणारे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल. पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळेल. महाराष्ट्रात दरवर्षी तयार होणाऱ्या २१ दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त कृषी अवशेषांपैकी १ लाख टन अवशेषांचा वापर करून सुमारे २५,००० टन बायोचार आणि ५०,००० पेक्षा अधिक कार्बन क्रेडिट्स निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रश्नोत्तर सत्राचे संचालन करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी केले. ज्ञानेश्वर शेंड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अनिल ढाके यांनी आभार मानले.


 

Next Post
भव्य रॅलीने एरंडोलमध्ये ‘युती’चा झंझावात!

भव्य रॅलीने एरंडोलमध्ये 'युती'चा झंझावात!

ताज्या बातम्या

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या
गुन्हे

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

June 12, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश
शैक्षणिक

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

June 12, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 12, 2026
मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई
गुन्हे

मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

June 12, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!

June 12, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group