• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण

विद्यार्थ्यांसाठी ए-आय कोर्सची माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 13, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण

जळगाव, (प्रतिनिधी) : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया (ICAI) च्या जळगाव शाखेस बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई विभागाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) च्या कार्यकारी मंडळाने भेट दिली. WIRC चे अध्यक्ष सी.ए. केतन सैया, उपाध्यक्ष सी.ए. पियुष चांडक, कोषाध्यक्ष सी.ए. फेनिल शाह आणि जळगाव शाखेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण
दिवसभरातील कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस कॅम्पस, पाळधी येथे अकाउन्टींग म्युझियमचे लोकार्पण झाले. श्री. पाटील यांनी हे म्युझियम ज्ञान, पारदर्शकता आणि व्यावसायिकतेचे प्रतीक असून, ते संपूर्ण देशातील ICAI शाखांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले.

मुंबई WIRC टीमने यावेळी पत्रकार परिषद घेतली. यात सी.ए. केतन सैया यांनी ICAI तर्फे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. यात सदस्य व विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कोर्स, वित्तीय साक्षरता अभियान, जीएसटी, इन्कम टॅक्स, सायबर फ्रॉड यावर मार्गदर्शन, ‘ट्रेन अर्न लर्न’ कोर्स आणि करिअर कॉन्सिलिंग प्रोग्राम घेण्यात येत असल्याचे सांगत प्रत्येक शाळेत अकाउन्टींग म्युझियम आणि प्रत्येक जिल्ह्यात सी.ए. विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली.

दिवसभरातील कार्यक्रमाची सुरुवात पांजरापोळ गौशाळेत “सामुहिक गौसेवा” आणि वृक्षारोपण करून झाली. तसेच सी.ए. फायनल व इंटरमिजीएट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात शारदा नेत्रालय व CA शाखेच्या संयुक्त विद्यमाने १५०० विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

WIRC टीमने जळगाव शाखेच्या कार्यातील ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली, तर जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी या भेटीमुळे शाखेच्या कार्यास नवीन प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, सेक्रेटरी सी.ए. सोहन नेहेते, कोषाध्यक्ष सी.ए. लक्ष्मिकान्त लाहोटी, कार्यकारी मंडळ सदस्य सी.ए. नचिकेत जाखेटीया, संयुक्त सदस्य सी.ए. हितेश जैन तसेच जळगाव सी. ए. शाखेचे सर्व माजी अध्यक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #chartedaccount#educational#jalgaon_city
Next Post
रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!

रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add