• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 13, 2025
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा
0
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील कृषीसम्राट फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांसाठी बियाणे, कीटकनाशके, खते तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी कृषीसम्राट फाउंडेशन आणि सनशाईन अॅग्रो यांच्या सहकार्याने बियाणे, खते व कीटकनाशके वितरित करण्यात आली. तसेच, दिवाळी सण जवळ आल्याने त्यांना फराळाचेही वाटप करण्यात आले.

रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या खासदार स्मिता वाघ यांनी भरारी फाउंडेशन शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आणि पूरस्थितीमुळे आलेल्या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आमदार सुरेश भोळे यांनीही या भीषण पूरस्थितीवर भाष्य करताना पूरग्रस्तांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी ही छोटीशी मदत असल्याचे सांगितले आणि शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन केले.

या मदतीसाठी जळगाव तालुक्यातील धानवड, उमाळे, सुभाषवाडी वराड, तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपरी, घुसर्डी, शिंदाड आणि जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील ५१ शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांच्यासह अनिश शहा, हर्ष चौधरी, रवींद्र लढ्ढा, डॉ. प्रसन्नाकुमार रेदासनी, नानासाहेब सुर्यवंशी, अनिकेत पाटील, आशिष भंडारी, आदेश ललवाणी, अॅड किशोर पाटील, सपन झुनझुनवाला, चित्रा चौधरी, सागर पगारीया, भगवान तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक जोशी, देवराज बोरसे, अक्षय सोनवणे, शिरीषकुमार तायडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले, तर आभार भूषण लाडवंजारी यांनी मानले.


 

Next Post
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना 'पंटर' गजाआड

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add