• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 13, 2026
in गुन्हे
0
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शनिपेठ पोलिसांनी सतर्कता दाखवत शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत होणारे बालविवाह यशस्वीपणे रोखले आहेत. पोलिसांनी २२ जून २०२६ रोजी जमुना नगर भागात आणि १० जुलै २०२६ रोजी कांचन नगर भागातील बिंदुबाई हॉल येथे होणारे बालविवाह वेळेत थांबवून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईनंतर पोलिसांनी बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला समूळ नष्ट करण्यासाठी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, भविष्यात असे कृत्य करणाऱ्यांना थेट जेलचा कडक इशारा दिला आहे.

​शनिपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यापुढे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल.

विशेष म्हणजे, यामध्ये केवळ माता-पिताच नव्हे, तर विवाहाला संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित किंवा काझी, मंडप डेकोरेटर्स, बँडवाले, वाजंत्री आणि फोटोग्राफर या सर्वांना सहआरोपी करून थेट जेलमध्ये पाठवले जाईल. हा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषींना २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होऊ शकते, तसेच संबंधित व्यावसायिकांचे व्यवसाय परवाने कायमचे रद्द केले जातील.

​हा केवळ संदेश नसून भविष्यातील कडक कायदेशीर चेतावणी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांचे पथक अशा गुन्ह्यांवर २४ तास लक्ष ठेवून असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोउनि प्रिया दातीर, परि. पोउनि संतोष खेडकर, परि. पोउनि अभिषेक कटारे यांच्यासह श्रीराम बोरसे, योगेश जाधव, विजय खैरे, अजय निकम, अनिल साळुंखे, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, संभाजी पाटील आणि गणेश ढाकणे आदींच्या पथकाने केली आहे.


 

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add