• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 13, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव ऑब्सटेट्रीक्स अ‍ॅन्ड गायनेकॉलोजी अर्थात जॉग्स सोसायटीचा पदग्रहण समारंभ हॉटेल प्रेसिडेंट येथे मोठ्या थाटात पार पडला. या सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

जागतिक स्तरावर मातामृत्यू कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या जपायगो आणि फॉग्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले होेते.

समारंभाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या समारंभात सन २०२६-२७ साठी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. डॉ. संदीपकुमार पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सचिवपदी डॉ. शलाका पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमात अ‍ॅडव्हान्सींग ग्लोबल स्ट्रॅटेजाईज फॉर मॅटर्नल डेथ प्रिव्हेंशन या विषयावरील वैद्यकीय शिक्षणांसंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा, जळगाव आयएमएचे सचिव डॉ. पंकज शहा, जळगाव स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या माजी अध्यक्षा डॉ. वैशाली चौधरी, माजी सचिव डॉ. अनिता बाविस्कर, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुधीर नारखेडे, डॉ. सुमन लोढा, डॉ. सुजाता महाजन, डॉ. रश्मी केळकर, डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. गडप्पा यांनी “जळगाव शून्य पीपीएच मातृमृत्यूकडे वाटचाल” या संकल्पनेला बळ देणारे महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून प्रसूतीनंतर होणार्‍या अतिरक्तस्रावाच्या (पीपीएच) व्यवस्थापनासाठी या शस्त्रक्रियेचे महत्त्व आणि मातृमृत्यू कमी करण्यातील त्याची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. तसेच संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ. संदीपकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना पदभार स्विकारल्यानंतर कार्यकाळात डॉक्टर आणि रूग्ण यांच्या प्रकृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

स्त्रीरोग तज्ज्ञांची अशी आहे कार्यकारणी..
सन २०२६-२७ साठी स्थापित करण्यात आलेल्या संघटनेत अध्यक्ष – डॉ. संदीपकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. आशिषकुमार वाघ, सचिव – डॉ. शलाका पाटील, कोषाध्यक्ष – डॉ. गजानन पाटील, सह सचिव डॉ. दिप्ती नेहते, डॉ. दिपा रत्नानी, डॉ. कोमल सरोदे, वैद्यकीय सचिव डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पूनम येवले, डॉ. प्रथमेश जैन, सांस्कृतिक सचिव डॉ. मेधावी चौधरी, डॉ. श्रध्दा राणे, डॉ. चंदन महाजन यांचा कार्यकारीणीत समावेश आहे.


 

Next Post
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add