• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

बायपास, व्हॉल्व्ह, जन्मजात हृदयरोग व जटिल हृदय शस्त्रक्रिया आता जळगावातच

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2026
in आरोग्य
0
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

जळगाव, (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रातील हृदयरोग उपचार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ख्यातनाम हृदय व रक्तवाहिनी शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांनी आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आपली सेवा सुरू केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक हृदय शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञ उपचार आपल्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत.

डॉ. यतीन वाघ यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय येथून कार्डिओ व्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी ही उच्च पदवी संपादन केली आहे. हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रातील दीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी हार्ट अँड व्हॅस्क्युलर केअर सेंटर आणि श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर महानगरांमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असूनही त्यांनी आपल्या मातृभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांप्रमाणेच दर्जेदार हृदय उपचार मिळावेत, या ध्येयाने त्यांनी कार्य सुरू केले. सुपरस्पेशालिटी आरोग्यसेवा उभी करताना आवश्यक पायाभूत सुविधा, आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

हृदयविकारांविषयी जनजागृती करण्याबरोबरच अनेक गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेतील थोरॅसिक सर्जरी फाऊंडेशन, शिकागो यांच्या “प्रत्येक हृदयाचे ठोके महत्त्वाचे – २०२०” या उपक्रमात समन्वयक शल्यचिकित्सक म्हणून त्यांची निवड झाली. याशिवाय राष्ट्रीय आरोग्यरत्न पुरस्कार, प्राऊड महाराष्ट्रीयन पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या सेवेमुळे आता बायपास हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया, जन्मजात हृदयरोग, महाधमनी शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व प्रकारच्या जटिल हृदय शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध होणार आहेत. अनुभवी कार्डिओलॉजिस्ट, अत्याधुनिक कॅथलॅब, कार्डियाक आयसीयू, आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने रुग्णांना सर्वोत्तम सेवा दिली जाणार आहे.

यावेळी डॉ. यतीन वाघ म्हणाले, “रुग्णसेवा हीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे हृदयरोग उपचार मिळावेत, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

“गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, “उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना महानगरांमध्ये जावे लागू नये, यासाठी सर्व सुपरस्पेशालिटी सेवा जळगावमध्ये उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. डॉ. यतीन वाघ यांच्यासारख्या अनुभवी हृदय शल्यचिकित्सकांच्या सहभागामुळे आमचा कार्डियाक सर्जरी विभाग अधिक सक्षम झाला असून याचा हजारो रुग्णांना लाभ होईल.”उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हृदयविकार उपचारांचे विश्वासार्ह केंद्र म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिक सक्षम झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण उपचारांची नवी दिशा निर्माण झाली आहे.


 

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add