• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

जळगाव, (जिमाका) : रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ परिसरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनुसार नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण व विदगाव येथील ७५० महिलांना भांडे संच वाटप कार्यक्रमाचा यशस्वी आयोजन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित होते.

पावसाळ्यात शेतकरी व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पातून रु. २ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर करून हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, “हा पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून, हा या भागातील ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी ठरेल. ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण झाली असून पावसाळ्यातील अडथळ्यांपासून आता मुक्ती मिळेल.”

तत्पूर्वी विदगाव येथे आयोजित कार्यक्रमात ७५० कामगार महिलांना भांडे संच वाटप करण्यात आले. “हा संच केवळ सहाय्य नव्हे, तर महिलांच्या कष्टाला दिलेला सन्मान आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता जनाआप्पा कोळी यांनी केले. सूत्रसंचालन राजू कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जनाआप्पा कोळी यांनी मानले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये तालुकाप्रमुख शिवराज पाटील, सभापती जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन, जितू पाटील, सरपंच चुडामन कोळी, उपसरपंच राजू कोळी, महेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, ज्ञानेश्वर कोळी, निलेश कोळी, गजानन सोनवणे, शालिक पाटील, सुनील पाटील, देवेंद्र कोळी, भगवान कुंभार, बळीराम कोळी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला विदगाव, नांद्रा, रिधुर, कानळदा परिसरातील शेतकरी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
चोपड्यातील योगिताताई ठरल्या पहिल्या पिंक रिक्षा चालक-मालक

चोपड्यातील योगिताताई ठरल्या पहिल्या पिंक रिक्षा चालक-मालक

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add