• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

जळगाव, (प्रतिनिधी) : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने अकोला येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात भुसावळचे रिजन चेअरमन डॉ. उमाकांत चौधरी यांना त्यांच्या वर्षभरातील उत्कृष्ट सामाजिक कार्य, प्रभावी नेतृत्व आणि सेवाभावी योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा सुर्वण पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

हा सन्मान दि. २८ जून २०२६ रोजी अकोला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल अश्विनकुमार बजोरिया यांच्याहस्ते डॉ. चौधरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गिरीश सिसोदिया, द्वितीय प्रांतपाल सुप्रिया कोतवाल, सचिव डॉ. गर्गे, कोषाध्यक्ष डॉ. मुरारका, अध्यक्ष प्रमोद नेमाडे, गोपाल अग्रवाल, डॉ. भोलाणे तसेच भुसावळ लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. उमाकांत चौधरी यांनी रिजन चेअरमन म्हणून कार्यरत असताना सेवा उपक्रम प्रभावीपणे राबविणे, सदस्यसंख्या वाढ मध्ये उल्लेखनीय योगदान, तसेच संघटन कौशल्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि समर्पित सेवाभाव यामुळे त्यांनी विशेष ठसा उमटविला. त्यांच्या या सर्वांगीण कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सुर्वण पदक बहाल करण्यात आला. डॉ. चौधरी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील, डॉ. बोरोले तसेच भुसावळ लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील सामाजिक आणि सेवाभावी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Next Post
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add