• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्टस अकॅडमी च्या विद्यमाने व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड पुरस्कृत दुसऱ्या जळगाव कॅरम लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मकरा चॅलेंजर्स संघाने आप्पासाहेब लिजेंड्स संघाचा २-१ ने पराभव करून लागोपाठ दुसऱ्यांदा ह्या स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. त्यांना रोख रुपये १८०००/- व चषक पारितोषिकाने गौरविण्यात आले. दुसऱ्यांदा उपविजेत्या ठरलेल्या आप्पासाहेब लेजेंड्स संघाला १२०००/- व चषकाने सन्मानित करण्यात आले.

अंतिम सामन्यातील एकेरीच्या पहिल्या सामन्यात मकरा चॅलेंजेसच्या जैद फारुकी याने आप्पासाहेब लिजेंड्स संघाच्या अभिजीत त्रिपणकरचा २२-१४, १९-२४, २५-१९ असा अतितटीच्या सामन्यात पराभव केला. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात आप्पासाहेब लेजेंड्स संघाच्या मोहम्मद अली बागवान याने मकरा चॅलेंजर्सच्या शेख हबीब यांचा १९-१२ व १८-१० असा पराभव करून सामन्यात एक-एक ने बरोबरी करून दिली.

दुहेरीच्या व निर्णायक सामन्यात मकरा चॅलेंजर्सच्या सलीम अन्सारी व मोहसीन खान या जोडीने आप्पासाहेब लिजेंड्स संघाच्या फिरोज खान व अफजल शेख यांचा ७-२५, २५-२२ व २५-११ असा पराभव करून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात स्पोर्ट्स हाऊस स्ट्राईकर्स संघाने साईनाथ टायटन्स संघाचा ३-० ने पराभव करून तिसरे क्रमांक प्राप्त केले त्यांचा रोख रुपये ७०००/- व चषक पारितोषिकाने गौरव केला.

साईनाथ टायटन्स संघाला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक रुपये ५०००/- व चषक देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात एकेरीच्या पहिल्या लढतीत स्पोर्ट्स हाऊसच्या पंकज पवार ने साईनाथ टायटन्सच्या अनिल मुंढेवर २५-७ व २५-१० असा, एकेरीच्या दुसऱ्या लढतीत स्पोर्ट्स हाऊसच्या सय्यद रिजवान ने साईनाथ टायटन्सच्या मुबशीर सय्यद चा २४-२१, १८-२५ व १८-१३ असा तसेच दुहेरीच्या सामन्यात स्पोर्ट्स हाऊसच्या सय्यद मोहसिन व अय्युब खान यांनी साईनाथ टायटन्सच्या रईस शेख व मेहमूद शेख या जोडीचा ९-१९, २०-१९ व २५-११ असा पराभव करून तिसरे क्रमांक मिळवले.

साईनाथ टायटन्सला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत पंकज पवारने दोन ओपन टू फिनिश, निसार अहमदने एक ओपन टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश तसेच जैद अहमदने एक एक ओपन टू फिनिशची नोंद केली. ओपन टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश करणाऱ्या सर्व खेळाडूंना जान्हवी स्पोर्ट्स चे सागर सोपारकर यांच्यातर्फे उत्कृष्ट असे स्ट्रायकर भेट देण्यात आले.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मकरा चॅलेंजर्सच्या जैद फारुकी, सर्वोत्कृष्ट उदयन्मुख खेळाडू म्हणून लिसर स्पोर्ट्सच्या दानिश शेख, सर्वोत्कृष्ट गेम प्लॅनिंग करिता मकरा चॅलेंजर्सचे व्यवस्थापक सय्यद जुबेर या सर्वांना चषक आणि रोख पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. फेअर प्ले अवॉर्ड चे पारितोषिक लीसर स्पोर्ट्स स्टार्स संघाने पटकावले.

अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी सर्व संघ मालक अनुक्रमे युसुफ मकरा, अॅड. रविंद्र कुलकर्णी, अॅड. आमीर शेख, अरीश शेख, अझर खान, अशफाक शेख, श्रीउत्तम हर्बल्स, सालार किंग्स चे प्रतिनिधी तसेच कॅरम असोसिएशनचे रोहन बाहेती, मंजूर खान, आयोजकांतर्फे सैय्यद मोहसिन, शेख हबीब, शरीफ खान, फिरोज खान, अताउल्लाह खान, नासिर खान, मोहम्मद फजल आदी उपस्थित होते. गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा समिती प्रमुख सय्यद मोहसिन यांनी आभार मानले.

स्पर्धा यशस्वी करण्याकरिता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, शालिग्राम राणे, रविंद्र धर्माधिकारी तसेच प्रमुख पंच.रोहित कदम, सहाय्यक पंच झोहेब खाटिक, सामन्यांचे पंच चंद्रशेखर नार्वरिया, सय्यद युसुफ, अवेस तंबोली, बिलाल शेख, यश धोंगडे, फैज शेख, हससान अन्सारी, मुबश्शीर अन्सारी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब वर कॅरम चॅम्पियन्स लाइव्ह चॅनेलवर मुकेश इंगुलकर यांनी प्रक्षेपित केले.


 

Next Post
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add